बुधवार, २९ मार्च, २०२३

नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी जन कल्याणाच्या योजना

 नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्याच्या योजना

महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण महामंडाळातर्गंत नोंदणी असलेल्या बांधकाम कामगार यांना आरोग्य साठी विवीध योजना आहेत.
नोंदणी साठी वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे आँनलाईन पदध्तीने करणे आवश्क आहे.

*आँनलाईन  नोंदणी आवश्य़क कागदपञे*

*ओळख पुराव्यासाठी आधार,पारपञ,वाहनचालक परवाना,रेशन कार्डे यापेैकी एक
*रहिवाशी पुराव्यासाठी आधार कार्डे,पारपञ,वाहनचालक परवाना, रेशन कार्ड मागील महिन्याचे वीज बील.
*वयासाठी आधार कार्ड,वाहनचालक परवाना,पँन कार्ड,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपञ,यापैकी एक
*स्वयंघोषणा पञ
*आधार संंमतीपञ
*मागील वर्षात ९० किंवा आधिक  दिवस काम केल्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांचे प्रमाणपञ 
* बँक पास बुकची छांयाकित प्रत


*****आरोग्यच्या योजना****

*नोंदणीकृत लाभार्थी स्ञी व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ रुपये व शस्ञक्रियेव्दारे प्रसुतीसाठी २० रुपये इतकी मदत मिळते.
*नोंदणी कृत कामगांराच्या कुंटुबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख रु इतके वैद्दकीय सहाय्य मिळते.
*एक मुलीच्या जन्मानंतर कुंटुब शस्ञक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव योजना
*नोंदणी कृत बांधकाम कामगांरास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये इतके आर्थीक मदत.
*व्यसनमुक्ती केंद्रा मार्फत उपचाराकरिता ६००० रु अर्थसहाय्य.
आधिक माहिती साठी व नोंदणी करणे नुतीकरण करणे या साठी खालील संकेत स्थळा ला भेट द्दा





सोमवार, २७ मार्च, २०२३

जाॅब कार्ड धारक मजुरांच्या रोजगारात 26 रु ची वाढ

नरेगा अंतर्गत मजुरी तर 26रु ची वाढ....... 

केंद्र शासनाच्या नरेगा या योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक मजुरांसाठी सध्याच्या मजुरी मध्ये 26 रुपये इतकी घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या 23- 24 च्या या वर्षासाठी रोजगार हमी योजनेसाठी एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार सदरील वाढ करण्यात आलेले आहे ही वाढ एक एप्रिल 2023 पासून लागू होईल
ग्रामीण भागात उपजीविकेची सुरक्षा वाढविण्यासाठी
आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसाचा रोजगार देणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे अकुशल योजनेसाठी स्व: इच्छेन पुढे येऊन काम करणाऱ्या प्रोढ व्यक्तीसाठी योजना आहे
कर्नाटक गोवा मेघालय व मणिपूर या राज्यांनी सदरील मजुरी मध्ये वाढ केलेली आहे






सोमवार, २० मार्च, २०२३

गुणवत्ता पूर्व शिक्षणासाठी मिळणार मोफत टॅब

राज्य सरकारच्या महाज्योती योजनेमार्फत मिळणार मोफत‌ टॅब व 6जीबी इंटरनेट








महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती जमाती-विमुक्त जमाती तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023 करिता पुर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेसाठी पात्रता

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
उमेदवार हा  इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक असावा
उमेदवार हा नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा
जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील
विद्यार्थी हा विज्ञान शाखेचा असावा



शनिवार, १८ मार्च, २०२३

अस्मानी संकट वाली कोण?

 अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मिळणार?????


सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, भरपूर प्रमाणात रब्बी हंगामातील पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न चालू असताना हे अस्मानी संकट शेतकऱ्या समोर उभे राहिले आहे.
गहू, ज्वारी, उन्हाळ्यातील बाजरी,मका, इ.पिकाचे तर इतके नुकसान झाले आहे की,त्याचे काढणी कश्याप्रकारे करावी  किंवा आहे तशीच नांगरट करावी याची चिंता शेतकरी वर्गाला आहे.
त्याचबरोबर भाजीपाला, फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांची तर पुरती वाट लागली आहे. आंबा,चिकु,लिंबोणी, पपई, केळी, इ. फळबाग व टरबूज, खरबूज, भाजीपाला मध्ये मिरची,कारले, दोडका, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर इ. भाजीपाला पिकांचे नुकसान तर शब्दात व्यक्त करण्यात येणार नाही.
तरी या अस्मानी संकटावर सरकार काय निर्णय घेणार, पंचनामे करून मदत कधी पर्यंत मिळणार हे शेतकरी वर्गाला न सुटणारे कोडे आहे.........

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

रोजगार हमी योजनेतुन गायगोठा पाहिजे असेल तर ही बातमी वाचा ....

 शरद पवार ग्राम समृध्दी योजना या पुढे राज्य योजना म्हणुन राबविणे बाबत 

                    राज्य सरकारची मोठी घोषणा 



माहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन गाय व म्हेैस या साठी पक्का गोठा बांंधण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या  त्या नुसार गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावराचे टँगीग करणे आवश्क होते .परंतु या संदर्भात स्वखर्चाने घेतलेल्या जनावरानां टँगीग करणे शेतकरी वर्गांना ञास दायक होते त्या मुळे शासनाने आज खालील प्रमाणे शुद्धिपञक काढुन नविन निर्णय घेतला आहे.


संबंधित गावचे ग्रामसेवक/ तांञिक सहाय्यक/ ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करुन लाभार्थीं यांच्या कडे असणांऱ्या जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी.पंचनामा करताना ग्रामसेवक , जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक हजर असणे आवश्क आहे .

सदरील शासन आदेश क्र.202303171306132616
आधिक माहिती साठी शासन निर्णय पहा

गुरुवार, १६ मार्च, २०२३

रेशन एवेजी या पुढे खात्यात पैसे

 एपीएल शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना धान्याएवेजी पैसे देणार

राज्यातील एपीएल कार्ड धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने २८फेब्रुवारी घेतला असून या निर्णयाच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानदाराकडे अर्ज करावा लागणार आहे त्याचा नमुना देखील स्वस्त धान्य दुकानातच पुरवठा विभागाकडून लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक यांना यापुढे या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने 31 मे 2012 आणि १ सप्टेंबर 2022 रोजी च्या पत्राद्वारे कळवले आहे.
या अर्जासोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पेजची व बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करावी.





बुधवार, १५ मार्च, २०२३

राज्यातील ई-श्रम वर नोंदणी असणाऱ्या कामगारांना दोन लाखांचा अपघात विमा

 असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विमा योजना


केंद्र शासनाच्या वतीने असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने विविध प्रकारच्या योजना सूरू केल्या आहेत त्यामध्ये कामगारांच्या उन्नती साठी शासन विविध योजना राबवित असते त्यामध्ये मलांचे शिक्षण, कुटूंबातील सदस्यांचे आरोग्य किंवा इतर योजना राबविल्या जातात आहेत.


सदरील योजनेचा लाभ ई -श्रम वर नोंदणी असणाऱ्या कुटुंबांना लाभ मिळणार आहे.

या योजनेत कामगारांना काम करत असताना अपघाती मृत्यू झाला अथवा अपंगत्व आल्यास त्यांना दोन लाख रुपये शासन देणार आहे.
अधिक माहिती साठी ई-श्रम वेबसाईट वर भेट करा


अधिक महिना जाणुन घ्या माहिती

  अधिक मास  अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...