मंगळवार, २५ जुलै, २०२३

अधिक महिना जाणुन घ्या माहिती


 अधिक मास

 अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा 32 दिवसांऐवजी 30 दिवसांशी संबंधित आहे.  चंद्र कॅलेंडर (चंद्रमान दिनदर्शिका) आणि सौर दिनदर्शिका (सौरमन दिनदर्शिका) दोन्ही हिंदू धर्मात वापरल्या जातात.

 चंद्राच्या कॅलेंडरनुसार, चंद्राची एक क्रांती सुमारे 29.5 दिवस घेते, म्हणून वर्ष म्हणून 12 चंद्रांचा विचार केला तर आपल्या कॅलेंडरमध्ये सुमारे 354 दिवस आहेत.  त्यामुळे सौर दिनदर्शिकेत दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो.

 हा 11-दिवसांचा फरक समतोल राखण्यासाठी, दर तिसऱ्या वर्षी, एक अतिरिक्त महिना किंवा अधिक दिवसांचा महिना जोडला जातो.  कार्तिक किंवा अश्विन महिन्यातील अमावस्या (नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस) नंतर हा अधिक मास जोडला जातो.  ही अधिककामाची उपलब्धी वर्षाच्या चंद्र महिन्याच्या आधारे निर्धारित केली जाते आणि हिंदू सण आणि धार्मिक कार्यक्रमांना सौर दिनदर्शिकेशी संरेखित करण्यात मदत करण्याचा हेतू आहे.

 काही वर्षांमध्ये, युनियन (क्षय) पूर्ण करण्यासाठी आणि चंद्र आणि सौर दिनदर्शिकेचे पुनर्कॅलिब्रेट करण्यात मदत करण्यासाठी आणखी दोन महिने देखील जोडले जाऊ शकतात.

 पंचांगात या आदिमासचा विशेष उल्लेख आहे आणि त्याच्या आधारे वैदिक धर्मातील अनेक सण, व्रत आणि उपासना योजलेल्या आहेत.

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा, इथे करा तुमचा हप्ता चेक

 या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा, इथे करा तुमचा हप्ता चेक





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली. पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रात ही योजना सुरु करण्यात आली आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मदत म्हणून दिले जातात. हे पैसे चार महिन्यांच्या फरकाने प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्यात 2 हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात. पण आता राज्य सरकारनेही तसाच निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना डबल पैसे मिळणार आहेत.

 

शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांचा हप्ता मिळेले. याचाच अर्थ प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा खरंतर खूप दिलासादायक निर्णय आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं कसा अर्ज करावा लागेल? याबाबतची अधिकृत माहिती सध्यातरी राज्य सरकारडून सविस्तरपणे जारी करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक-दोन वाक्यात माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांना जसे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात अगदी तसेच पैसे राज्य सरकारकडूनही त्याचवेळी मिळतील. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकाचवेळी ते पैसे जमा होतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.‘या’ नागरिकांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी.

राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेतलाय. याचाच अर्थ जसे निकष केंद्राचे आहेत तसेच निकष राज्यातही असू शकतात. पीएम किसान योजना ही देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. पण यामध्ये घटनात्मक पदावरील व्यक्ती उदाहरणार्थ राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, आजी-माजी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, महापौर, आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सनदी लेखपाल, वास्तूरचनाकार यांना वगळण्यात आलंय. तसंच राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतही या नागरिकांना वळवलं जाण्याची शक्यता आहे.योजनेचा पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
पीएम किसान योजनेचा लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांना गावच्या तलाठी कार्यालयाकडे आधारकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स द्यावी लागली होती. त्यातून त्यांची नाव नोंदणी करण्यात आली होती. आतादेखील तशीच कागदपत्रे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात दाखल करावी लागू शकतात.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी विशेष वेबसाईट बनवली आहे. तिथे शेतकरी स्वत: अर्ज दाखल करु शकतात आणि आपल्या माहितीत बदलही करु शकतात. आता राज्य सरकारकडूनही तसं वेब पोर्टल सुरु केलं जाण्याची शक्यता आहे.

नमो किसान सन्मान योजनेसाठी ऑनलाईन नोंदी केली जाऊ शकते. त्यासाठी अधिकृत पोर्टलची माहिती देखील जारी केली जाईल. त्यानंतर शेतकरी सायबर कॅफे, महा ई सेवा केंद्र आणि इतर ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरु शकतील. अर्थात याबाबत नवी काही अपडेट आल्यास आम्ही आमच्या ‘टीव्ही 9 मराठी’ वेबसाईटवर सविस्तर माहिती देणार आहोत.

शुक्रवार, ५ मे, २०२३

2023 यंदा भरपुर पाऊस ! काळजी नसावी !! पंजाबराव डख

 2023 यंदा भरपुर पाऊस ! काळजी नसावी !! पंजाबराव डख


देशात अल निनोचा प्रभावामुळे पाऊस कमी पडेल असे भाकीत अमेरिकन हवामान विभाग तसेच स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवल्यानंतर तसाच अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये विशेष मध्य भारतातील गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान पावसाचे खूप कमी असेल असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार शेतीचे पुढील नियोजन करत असतात. स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या कमी पाऊस पडनार असं जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तेव्हा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका असा दिलासा देत यंदा भरपुर पाऊस पडेल असे सांगितले आहे.अलनिनोचा पावसावर फारसा परिणाम होत नाही, आणि मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर पाऊस होईल असा दावा त्यांनी केलाय.तर यंदा महाराष्ट्रात मान्सून चे आगमन हे 08 जुन ला होईल व 22 जुनपर्यत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल व 27,28 जुनपासून पेरणीला सूरुवात होईल.असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार यंदा जुनपेक्षा जूलै, ऑगस्ट, सप्टेंबर,ऑक्टोबर या महिन्यात जास्त पाऊस पडेल.आणी महाराष्ट्रातील लहान मोठी धरणे तुडुंब भरतील असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. पुढे 26 ऑक्टोबर ला थंडीला सुरुवात होईल. असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

बुधवार, ३ मे, २०२३

‘या’ पिकाची शेती करा आणि कमवा 10 ते 12 लाख रुपये

 शेतकऱ्यांनो .. ‘या’ पिकाची शेती करा आणि कमवा 10 ते 12 लाख रुपये


ग्रीन चिली फार्मिंग व्यवसाय यात तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या हा व्यवसाय खूप ट्रेंडमध्ये आहे. मिरचीची लागवड केल्याने तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. कारण मिरची डिशमध्ये चव आणण्याचे काम करते. म्हणजेच मिरचीशिवाय सर्व पदार्थ निरुपयोगी आहेत.
मिरची लागवडीचा खर्च जाणून घ्या
दुसरीकडे जर आपण 1 हेक्टर शेतीबद्दल बोललो तर आपल्याला 7 ते 8 किलो मिरचीची आवश्यकता असेल. ज्याची किंमत 20 ते 25 हजार रुपये असू शकते. संकरित बियाणे पेरल्यास 35 ते 40 हजार रुपये खर्च करावे लागतील.

मगधीरा बीचसाठी 40 हजार रुपये आकारले जातील. यासोबतच शेताची नांगरणी, खते, सिंचन, औषधे, मार्केटिंग आदी कामे करावी लागणार आहेत. यानुसार 1 हेक्टरमध्ये एकूण अडीच लाख ते 3 लाख रुपये खर्च येतो.

नफा किती होईल
मगधीरा दरम्यान पेरणी केल्यास 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळू शकते. बाजारात मिरचीचा दर 30 ते 80 रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत समजा तुम्ही 50 रुपये किलोने मिरची विकली तर 300 क्विंटल मिरचीची किंमत 15 लाख रुपये असेल. म्हणजे 1 हेक्टरमध्ये सुमारे 12 लाख रुपयांचा नफा होईल. त्याचे फायदे पाहून तुम्ही एकदा ट्राय करू शकता.
शेती कशी करावी
माहितीसाठी मिरचीची लागवड बेड तयार करून केली जाते. वर्षाच्या कोणत्याही हंगामात लागवड करता येते. पण हंगामानुसार मिरचीचे प्रकार आहेत आणि त्यांची काळजी घेण्याच्या पद्धतीही आहेत. चांगल्या पिकासाठी संकरित बियाणे निवडावे.

जर तुम्हाला स्वतः रोपवाटिका लावायची नसेल तर रोपवाटिकेतून रोपे खरेदी करा. त्याची झाडे 2-2 फूट अंतरावर असावीत. त्याचे अंतर 2 ते 3 फूट ठेवावे. जेणेकरून हवा सतत फिरत राहते. संकरित बियाणे 60 ते 70 दिवसांत तयार होते आणि त्याचे पीक 9 ते 10 महिन्यांत तयार होते. पिकाचे उत्पादन कमी होणार नाही याची काळजी रोजच घ्यावी. मिरची हिरवी तसेच वाळलेली विकली जाऊ शकते.


रविवार, १६ एप्रिल, २०२३

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एकत्रित)

प्रधानमंञी जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य या पुढे एकञीत पणे राबविणार.......

 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. योजनेंतर्गत निवडक आजारांवर शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांच्या जाळयामार्फत पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थी गटांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. ही योजना पूर्वी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने ओळखली जात होती व दि.2 जुलै,2012 पासून आठ जिल्हयांत लागू करण्यात आली होती. त्यांनतर दि.21 नोव्हेंबर,2013 पासून ही योजना महाराष्ट्रातील उर्वरीत 28 जिल्हयांमध्ये विस्तारीत करण्यात आली होती. दि. 14 डिसेंबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेच्या नावात ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अशी अंशत: बदल करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून दि.23 सप्टेंबर,2018 पासून राज्यात लागू करण्यात आली. सदर योजना राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरु करण्यात आली. ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांपैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना,2011 च्या यादीतील (SECC database) 83.63 लक्ष कुटुंबे या योजनेची लाभार्थी आहेत. दि.1.04.2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत एकत्रित योजनेतील गट-अ लाभार्थी कुटुंबांना 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.5 लक्ष रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जात आहे. गट-अ लाभार्थी कुटुंबांच्या वतीने राज्य आरोग्य हमी सोसायटी प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष रु.797/- विमा रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये विमा कंपनीस अदा करीत आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील गट-ब व गट-क लाभार्थ्यांना हमी तत्त्वावर उपचार पुरवित आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचारांकरिता रु.1.5 लक्षापुढील ते रु.5 लक्ष रकमेपर्यंतचे व केवळ सदर योजनेत अंतर्भूत असलेल्या 213 उपचारांकरिता रु.5 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटी हमी तत्त्वावर पुरवित आहे. कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दि.23 मे, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी हमी तत्त्वावर विस्तारीत करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी सदर योजनेस मुदतवाढ दिली होती तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सूचनेनुसार दि.06.06.2022 पासून सदर विस्तारीत योजना स्थगित करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपुर्णत: निधी प्राप्त होत आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची केंद्र व राज्य शासन यामध्ये 60:40 या प्रमाणात विभागणी करण्यात आली आहे.

आधिक माहिती साठी  संकेत  स्थळाला भेट द्दा.


 

रविवार, ९ एप्रिल, २०२३

रेशन मिळाले का ? मग मेसेज पण आला का पहा

 कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर पाॅस मशीन ला लिंक करणार


रेशन दुकानातील धान्याचा वितरण व्यवस्थेतील सर्वाधिक महत्त्वाचे पाऊल म्हणजे कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर पाॅस मशीन ला लिंक करणार आहेत.
यामध्ये संबंधित रेशनकार्ड धारकांना किती धान्य मिळाले याचा धान्य खरेदी केली की लगेच मोबाईल वर मॅसेज येणार आहे.
ग्राहकांना जो मेसेज पोहोचला तोच मेसेज त्या च सेकंदाला जिल्ह्यातील वितरण प्रणाली ला नोंदविला जाणार आहे.
त्यामुळे धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होईल.
पुरवठा विभाग आधार सिडीग सह मोबाईल नंबर जोडण्याचे काम करणार आहे.




बुधवार, २९ मार्च, २०२३

नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी जन कल्याणाच्या योजना

 नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्याच्या योजना

महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण महामंडाळातर्गंत नोंदणी असलेल्या बांधकाम कामगार यांना आरोग्य साठी विवीध योजना आहेत.
नोंदणी साठी वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे आँनलाईन पदध्तीने करणे आवश्क आहे.

*आँनलाईन  नोंदणी आवश्य़क कागदपञे*

*ओळख पुराव्यासाठी आधार,पारपञ,वाहनचालक परवाना,रेशन कार्डे यापेैकी एक
*रहिवाशी पुराव्यासाठी आधार कार्डे,पारपञ,वाहनचालक परवाना, रेशन कार्ड मागील महिन्याचे वीज बील.
*वयासाठी आधार कार्ड,वाहनचालक परवाना,पँन कार्ड,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपञ,यापैकी एक
*स्वयंघोषणा पञ
*आधार संंमतीपञ
*मागील वर्षात ९० किंवा आधिक  दिवस काम केल्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांचे प्रमाणपञ 
* बँक पास बुकची छांयाकित प्रत


*****आरोग्यच्या योजना****

*नोंदणीकृत लाभार्थी स्ञी व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ रुपये व शस्ञक्रियेव्दारे प्रसुतीसाठी २० रुपये इतकी मदत मिळते.
*नोंदणी कृत कामगांराच्या कुंटुबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख रु इतके वैद्दकीय सहाय्य मिळते.
*एक मुलीच्या जन्मानंतर कुंटुब शस्ञक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव योजना
*नोंदणी कृत बांधकाम कामगांरास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये इतके आर्थीक मदत.
*व्यसनमुक्ती केंद्रा मार्फत उपचाराकरिता ६००० रु अर्थसहाय्य.
आधिक माहिती साठी व नोंदणी करणे नुतीकरण करणे या साठी खालील संकेत स्थळा ला भेट द्दा





अधिक महिना जाणुन घ्या माहिती

  अधिक मास  अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...