शनिवार, १८ मार्च, २०२३

अस्मानी संकट वाली कोण?

 अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मिळणार?????


सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, भरपूर प्रमाणात रब्बी हंगामातील पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न चालू असताना हे अस्मानी संकट शेतकऱ्या समोर उभे राहिले आहे.
गहू, ज्वारी, उन्हाळ्यातील बाजरी,मका, इ.पिकाचे तर इतके नुकसान झाले आहे की,त्याचे काढणी कश्याप्रकारे करावी  किंवा आहे तशीच नांगरट करावी याची चिंता शेतकरी वर्गाला आहे.
त्याचबरोबर भाजीपाला, फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांची तर पुरती वाट लागली आहे. आंबा,चिकु,लिंबोणी, पपई, केळी, इ. फळबाग व टरबूज, खरबूज, भाजीपाला मध्ये मिरची,कारले, दोडका, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर इ. भाजीपाला पिकांचे नुकसान तर शब्दात व्यक्त करण्यात येणार नाही.
तरी या अस्मानी संकटावर सरकार काय निर्णय घेणार, पंचनामे करून मदत कधी पर्यंत मिळणार हे शेतकरी वर्गाला न सुटणारे कोडे आहे.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अधिक महिना जाणुन घ्या माहिती

  अधिक मास  अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...