मंगळवार, १४ मार्च, २०२३

राष्ट्रीय कृषी विकास योजने साठी ११.३४ कोटी चा निधी मंजुर

 अनुसुचित जाती प्रवर्गकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन ११.३५ कोटी चा निधी वितरीत....

सन २०२२-२३ या सालासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता केंद्र च्या हिश्शयाचा रु ६.८० रु व राज्य हिश्शयाचा ४.५४ रु. एकुण ११.३४ कोटी चा निधी आयुक्त कृषी यांना वितरीत करण्यासाठी शासनाच्या विचाराधीन होता त्या मुळे शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना - कँफेटेरिया ही योजना केंद्र व राज्या शासनाच्या अनुक्रमे ६० .४० प्रमाणात अर्थसहाय्याने राबविण्यात येते,या योजनेतील सन २२-२३ मध्ये प्राप्त पहिल्या हप्त्यात अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता एकुण ११.३४ कोटी रुपायाचा निधी वितरीत करण्यास मुंजरी देण्यात आली आहे. सदर निधी च्या खर्चाची अंमलबजावणी  पीएफएमएस व्दारे करण्यात येणार आहे.


हा निधी केवळ अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता वितरीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वैयक्तिक लाभाच्या प्रकल्पांतर्गत सर्व विभागांनी आधार संलग्न बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाव्दारे अनुदान वितरीत करावे 
असे या शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.
आधिक माहिती साठी शासन निर्णय पहा.
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अधिक महिना जाणुन घ्या माहिती

  अधिक मास  अधिक मास, ज्याला "अधिक मास" देखील म्हणतात, हा हिंदू कॅलेंडरमधील एक विशेष महिना आहे जो कॅलेंडरमध्ये किंवा उच्चारात एकदा...